राज्यातील मुंबईच्या दोन जागांसह कोल्हापूर, धुळे, नागपूर,अकोला विधान परिषद मतदार संघासाठी निवडणूक होत आहे.
त्यामुळे आजपासून विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असं म्हणायला काही हरकत नाही.
राज्यातील आठ विधानपरिषद सदस्यांचा १ जानेवारी २०२२ रोजी कार्यकाळ संपणार आहे. मात्र, सहा जागांसाठीच हि निवडणूक होणार आहे.
कोणत्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे?
मुंबई : रामदास कदम (शिवसेना)
मुंबई : भाई जगताप (काँग्रेस)
कोल्हापूर : सतेज पाटील (काँग्रेस)
धुळे-नंदुरबार : अमरीश पटेल (भाजप)
नागपूर : गिरिश व्यास (भाजप)
अकोला : गोपीकिशन बाजोरिया (शिवसेना)
तर, प्रशांत परिचारक (भाजप) सोलापूर व अरूणकाका जगताप (राष्ट्रवादी) अहमदनगर या दोन जागांसाठी निवडणूक होणार नाही.
असा असणार निवडणूक कार्यक्रम :
अधिसूचना जाहीर - 16 नोव्हेंबर
अर्ज दाखल करण्याची तारीख - 23 नोव्हेंबर
अर्ज छाननी - 24 नोव्हेंबर
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख - 26 नोव्हेंबर
मतदान - 10 डिसेंबर,
मतमोजणी / निकाल - 14 डिसेंबर
0 Comments