रिधोरा गावाजवळ असलेल्या ईगल कन्स्ट्रक्शनच्या हॉटमिक्स प्लांट येथे अग्नितांडवात दोन मजुरांचा होरपळून मृत्यू तीन गंभीर जखमी
अकोला : अकोल्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील रिधोरा गावाजवळ असलेल्या ईगल कन्स्ट्रक्शनच्या हॉट मिक्स प्लांट येथे डांबरच्या टँकरला वेल्डिंग दरम्यान स्फोट होऊन भीषण आग लागली.
यात वेल्डिंग करणाऱ्या पाच मजूरां पैकी दोन मजुरांचा होरपळून जागीच मृत्यू झाला, तर तीन मजूर गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
जखमींना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात केलं दाखल करण्यात आले आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमनच्या तीन गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.
0 Comments