अकोट ग्रामीण पोलीसाची धडक कारवाई..!
८ गोवंशाना जिवदान ३ लाख ७५ हजाराचा मुद्देमाल जप्त.!
तालुका प्रतिनिधी अकोट
देवानंद खिरकर :- अकोट शहरासह ग्रामीण भागात गोवंश कत्तली करीता मध्यप्रदेशातून धारणी अजनंगाव मार्गे सर्रास मोठ्याप्रमाणात गोवंशाची तस्करी केली जात असून अकोट ग्रामीण पोलीसाना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून दि. 25 नोव्हेंबर 2021 रोजी अकोट अंजनगाव मार्गावर रुईखेड फाट्यावर अकोट ग्रामीण पोलीसानी नाकाबंदी केली असता एक पिकअप वाहन थांबवण्या चा प्रयत्न केला असता पोलिसांना पाहून पिकअप न थांबवता पळून गेला अकोट ग्रामीण पोलीसानी सिनेस्टाईल पाठलाग करून आंबोडा येथे पुला जवळ पकडले असता वाहन चालक पळून गेला त्याचा पाठलाग केला असता मिळून आला नाही.
वाहन क्रमांक एम एच 30 ए.व्ही 0530 मध्ये गोरे ,बैल किंमत 75000 रुपये चा मुद्देमाल व एक पिकअप वाहन किंमत 3 लाख रुपये असा एकूण 3 लाख 75 हजार रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला नमूद पिकअप चे चालकाविरुद्ध पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण येथे आप नंबर 434/2021 कलम 5 (अ)9 महा प्राणी संरक्षण अधिनियम सह कलम 11 (ड)प्राण्यांना निर्दयतेने वागविणे अधिनियम 1960 सकलम 119 महा. पोलीस अधिनियम 1951 अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर साहेब यांचे आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत मॅडम सह पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम यांचे मार्गदर्शना खाली अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन देशमुख ,ए एस आय संजय बोरोडेे, पो.कॉ.वामन मिसाळ, चालक पो.हे.कॉ.गौंडचोर यांनी केली
मध्यप्रदेशातून मोठ्याप्रमाणात अकोट उपविभागात कत्तलकरीता हिवरखेड हद्दीतील झरीगेट अकोट ग्रामीण भागातील पोपटखेड गेट व अजनंगाव मार्गावरून गोवंश तस्करी होत असल्याचे दिसून येत आहे.
यासाठी धारणी येथून गोवंशाची खोटे कागद पत्र तयार करून देणारी टोळी सक्रिय असल्याची चर्चा आहे.
0 Comments