Header Ads Widget

Responsive Image

प्रेम संबंधात तगादा लावणाऱ्या प्रियसीचा खुन.. आरोपी अटकेत


धुळे : - दिपक देवेंद्र भावसार

प्रेम संबंधात तगादा लावणाऱ्या प्रियसीचा खुन.. आरोपी अटकेत

स्थानिक गुन्हे शाखेने शिंदखेडा तालुक्यात झालेल्या खुनाची उकल करीत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. शिंदखेडा तालुक्यातील तापी नदीच्या गिधाडे येथील पुलावर मंगळवार, 5 ऑक्टोबर रोजी एका तरुणीचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आढळला होता.

धुळे गुन्हे शाखेने या तरुणीची ओळख पटवत गुन्ह्यातील आरोपीला अटक केली आहे. मनोज उर्फ मनोहर युवराज पाटील (सुरत) असे अटकेतील आरोपीचे तर रुपाली उर्फ माया संदीप पाटील (31, दिंडोली, सुरत) असे मयत तरुणीचे नाव आहे.

प्लॉट दाखवण्याच्या बहाण्याने केला खून
मयत रुपाली उर्फ माया पाटील यांच्या पतीचे एक वर्षांपूर्वीच निधन झाल्याने त्या सुरत येथे वास्तव्यास होत्या. संशयीत आरोपी मनोज पाटील व त्यांच्यात ओळख निर्माण झाल्यानंतर आरोपीने रुपाली यांना प्लॉट दाखवण्याच्या बहाण्याने चारचाकीने नंदुरबार येथे आणले व तेथून शिंदखेडा जवळील गिधाडे पुलावर क्लोरोफार्म सुंगवून तरुणीचा गळा आवळून खून केला व पळ काढला. सुरुवातीला तरुणीची ओळख न पटल्याने स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा बारकाईने तपास केल्यानंतर सोमवार, 4 ऑक्टोबर रोजी तरुणीसोबत एक पुरूष गुजरात पासींग वाहनाबाहेर उभे राहून गप्पा मारीत होता, अशी माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर मयत गुजरातमधील असावी, अशी शक्यता गृहीत धरून पथकाने सुरतमधील विविध भागात जावून तरुणीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केल्यानंतर मयत डिंडोली, उधना, सुरत भागातील रहिवासी असल्याची ओळख पटली व गुन्ह्याचा उलगडा होण्यास मदत झाली.

Post a Comment

0 Comments