Header Ads Widget

Responsive Image

नवरात्री निमित्ताने आदिवासी पाड्यावर मोफत सॅनिटरी पॅड चे वाटप


नवरात्री निमित्ताने आदिवासी पाड्यावर मोफत सॅनिटरी पॅड चे वाटप

  ४०० पॅड वाटप करण्याचा संकल्प

धुळे : दिपक भावसार 

आदिवासी पाड्यावरील स्त्रियांना प्रत्येक महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीच्या वेळी महागडे सॅनिटरी पॅड विकत घेणे परवडत नसल्याने अस्वच्छ कापड वापरून आजाराच्या आहारी जावे लागते.

  या नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने के.वाय.के.एम फाऊंडेशनच्या प्रकल्प "सक्षम" अंतर्गत खुशीयांन फाऊंडेशनच्या साहाय्याने अवधान येथील वानरदेव वस्ती आणि एकलव्य नगर येथील आदिवासी पाड्यावर सॅनिटरी पॅड वाटण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमासाठी खुशीयांन फाऊंडेशनचे संस्थापक चिनू क्वात्रा आणि प्रकल्प समन्वयक तसेच के.वाय.के.एम चे महाराष्ट्र व्यवस्थापन समिती सदस्य वैभव गायकवाड यांच्या वतीने सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्यात आले, विशेष म्हणजे हे पॅड स्वतः वैभव गायकवाड यांनी घरी तयार केलेले असून इको फ्रेंडली आणि पुनः वापरता येण्यायोग्य आहेत. या नवरात्री निमित्ता ने ४०० पॅड वाटप करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. 
            तसेच प्रकल्प "सक्षम" च्या माध्यमातून मासिक पाळीच्या वेळी कशाप्रकारे काळजी घ्यावी याबाबत दिव्या सावळे यांनी समुपदेशन केले. तर येत्या काळात प्रत्येक महिन्यात १०० महिलांना पॅड देण्याचा उद्देश के.वाय.के.एम तर्फे ठेवण्यात आला आहे असे प्रतिपादन रीना पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी के.वाय.के.एम फाऊंडेशनचे संस्थापक सहसचिव चेतन उपाध्याय आणि धुळे जिल्हाध्यक्ष प्रसाद महाले हे उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे नियोजन के.वाय.के.एम च्या स्वयंसेविका दिव्या सावळे आणि रीना पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments