- जिल्हा पोलीस क्रिकेट दलाचा पुढाकार - बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा समारोप
अकोला :- जिल्हा पोलीस दलाच्या वतीने घेण्यात आलेल्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुरुषात जिल्हा पोलीस अधिक्षक संघ तर महिलांमध्ये सिटी डिव्हिजन यांनी जेतेपद पटकाविले तर जिजा 11 व वाहतूक पोलिसांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, स्नेहा चव्हाण यांनी पुरस्कार पटकाविले.
जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबात एकत्रीकरण व स्नेह वृद्धिंगत व्हावा यासाठी जिल्हा पोलीस दलाच्यावतीने बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत जिल्हा पोलीस अधीक्षक संघ व शहर वाहतूक शाखा यांच्यात अंतिम सामना खेळविण्यात आला. यामध्ये पोलीस अधीक्षक संघाने वाहतूक पोलिसांचे 36 धावांचे आव्हान पार करत जेतेपद पटकाविले. तर महिलां मध्ये सिटी डिव्हिजनने जिजा 11चे 6 षटकात 34 धावांचे आव्हान पार खरच जेतेपद पटकावले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत व्हीसीएचे संयोजक भरत डिक्कर,एसडीपीओ रितू खोकर वसंत बाचुका स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले पोलीस निरीक्षक गुलसुंदरे,
विलास पाटील ,नितीन शिंदे आदींची उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषकाने सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत समालोचक निलेश घाडगे, गोपाल मुकुंदे तर पंच बंटी क्षीरसागर, अजय डोंगरे, स्कोरर यश सिरसाट, अर्जुन इंगळे, व्हिडीओ सन्नाटा स्पोर्ट्सचे अमित वाकडे, साऊंडचे आंबे साउंड यांनी काम पाहिले.
जिल्हा पोलीस अधिक्षकांचे वडील गोविंदराजन,आई शांती, बहीण श्रीदेवी यांची उपस्थिती होती. यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कुटुंब सदस्य उपस्थित होते.
-- या खेळाडूंनी पटकाविले पुरस्कार या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, तर महिलांमध्ये
स्नेहा चव्हाण यांनी तर एक उत्कृष्ट गोलंदाज रवी ठाकूर,अर्चना बोडडे तर बेस्ट बेस्टमॅन कृष्णा काटकर, सोनाली राठोड यांनी पटकाविले.
0 Comments