या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शहरातील प्रसिद्ध व्यापारी नागनाथ आप्पा सराफ यांच्या दुकाना तून बुधवार दुपारी साडेबारा वाजण्या च्या दरम्यान एका बुरखाधारी महिलेने हातचलाखीने दीड तोळा सोन्याची पोत चोरल्या बाबत पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथील गुन्हा दाखल होता.
सदर गुन्ह्याचा तपास शहर पोलिसांनी सुरू केला होता. त्या दरम्यान एक बुरखाधारी महिला पुन्हा नागनाथ आप्पा सराफ यांच्या दुकानात येऊन संशयित हालचाली करीत असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलीस स्टेशचे पथक सराफ यांच्या दुकानात पोहोचले असता सदर संशयित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेऊन सखोल तपास सुरू केला.
सदर संशयित महिला मुमताज परवीन अब्दुल शकील वय ५५ वर्षे राहणार,अकोट,इंद्रानगर जवळ, अकोला असे असल्याचे समजले. सदर महिलेचा पूर्व इतिहास पाहता सदर महिलेवर वाशिम,धुळे,यवतमाळ अकोला अशा जिल्ह्यामध्ये अनेक चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले.
सदर महिलेला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता १५ आँक्टोंबर रोजी नागनाथ आप्पा सराफ यांच्या दुकानातून पंधरा ग्रॅमची सोन्याची पोत चोरल्याचे कबूल केल्यावरून पोलिसां नी १५ ग्रॅम सोन्याची पोत आरोपी महिलेकडून जप्त केली आहे.
सदर महिलेकडून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक राकेश कलासागर अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे सहाय्यक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे ,अभय माकणे अंमलदार बालाजी बोके,संभाजी लकुळे,रेश्मा शेख,प्रशांत वाघमारे, गणेश लेकुळे,असलम गारवे,साळुंखे होगे यांच्या पथकाने केली.
0 Comments