खुद्द खासदाराच्यां गावातच अपंग शेतकऱ्या ची आत्महत्या
अकोला तालुक्यातील एका अपंग शेतकऱ्यांने तलाठ्याने सातबारा नावावर न केल्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. २६) घडली. जोपर्यंत तलाठ्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत भावाचा मृतदेह घेवून जाणार नाही, अशी भूमिका मृतकांच्या नातेवाईकांनी घेतली आहे.
ही घटना माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपचे खासदार संजय धोत्रे यांच्या गावातील आहे,हे विशेष राम बाबूलाल वानखडे असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
राम बाबूलाल वानखडे यांच्या नावावर वडिलांच्या नावाची 5 एकर 21 आर ही शेती आली होती. राम वानखडे हे अपंग आहेत. ही शेती स्वतःच्या नावावर व्हावी, म्हणून राम वानखडे यांनी तलाठी, त्यानंतर जिल्हाधिकारी, एसडीओ, मंडळ अधिकारी यांच्याकडे चकरा मारल्या. त्यांनी सर्वांनी अपंग राम वानखडे यांच्या बाजूने निर्णय दिला. त्यानंतर अपंग राम वानखडे यांनी परत तलाठी यांच्याकडे शेत आपल्या नावावर करून देण्यासाठी चकरा मारल्या. परंतु, तलाठी यांनी राम वानखडे यांच्या नावावर सातबारा केला नाही.
परिणामी, राम वानखडे यांनी घरातील शेतीसाठी असलेले कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचे भाऊ शरद वानखडे आणि रणजित वानखडे व इतर नातेवाईकां नी राम वानखडे यांच्या मृत्यूला तलाठी याच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. जोपर्यंत तलाठी यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत भावाचा मृतदेह येथून नेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे, हे सर्व प्रकरण माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार संजय धोत्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांच्या गावातील आहे.
0 Comments