पोलीस अधीक्षक अकोला यांचे विशेष पथकाने आज दिनांक 24/10/21 रोजी पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण हद्दीत अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई केली असता त्यामध्ये नामे जनाबाई शिगाळे वय 75 वर्ष रा. वडाळी देशमुख हिच्या घरी रेड केली असता त्यांनी आपल्या राहत्या घरात देशी दारू ची विना परवाना विक्री करतांना मिळून आले.
तेथून देशी दारूचे 438 कॉटर किंमत 13000 रु. ची देशी दारू मिळून आल्याने आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन मूर्तिजापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत मॅडम यांचे मार्गदर्शना खाली विशेष पथकाचे प्रमुख श्री. विलास पाटील साहेब यांनी व त्यांचे पथकाने केली आहे.
0 Comments