विशेष पथकाची क्रिकेट टी 20 मैच वर सट्टा खेळविणारे बुकिवर छापा दोन आरोपीनां अटक 02 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त
दि, 24/10/21 रोजी टी 20 क्रिकेट विश्वकप मधील श्रीलंका व बांग्लादेश यांच्यातील चालणाऱ्या मैचवर पैशाची बाजी लावून हारजितचा जुगार एका अपार्टमेंटमध्ये चालत आहे अशी खात्रिशिर खबर विशेष पथकातील पोलिस निरीक्षक विलास पाटिल यांना मिळाली.
त्यावरून 2 पंचा समक्ष सातव चौक मधील नवजीवन अपार्टमेंट मधील चवथ्या मजल्यावऱील फ्लॅट मध्ये छापा मारला असता.आरोपी
1, राकेश ओम प्रकाश बाजोरिया रा.जसनागरा बेकरी
2, करण राजेश पड़घन वय 20 वर्ष रा.क्रीड़ा संकुल मागे जठार पेठ हा केबल TV वर चालू असलेल्या टी 20 क्रिकेटची मैच श्रीलंका व बांग्लादेश च्या मधील मैच वर पैसे लावुन जुगार खेळविताना मिळून आल्याने त्यांच्या जवळून जुगाराचे नगदी 30,100 रुपये, 12 मोबाइल किंमत 1,42,000 रुपये , 1 TV संच किंमत 15000 रुपये,लॅपटॉप 1 किंमत 25000 रुपये,कीबोर्ड माउस, टाटा स्काय केबलसेट अप बॉक्स, 4 राउटर किंमत 15000 रुपये व इतर साहित्य असा एकूण 2,02,100, रूपयांचा जुगाराचा मुद्देमाल आरोपी जवळून मिळून आल्याने आरोपी विरुद्ध जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4, 5,अन्वये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास पोलिस करीत आहेत,
सदर कार्यवाही मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटिल यांच्या पथकाने केली.
0 Comments