दिनांक 30 /10 /2021
धुळे : धुळे एज्युकेशन सोसायटीच्या मा.ध. पालेशा वाणिज्य महाविद्यालया तील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली.
पालेशा महाविद्यालयात हा सप्ताह दक्षता सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे.त्याअंतर्गत भ्रष्टाचार निर्मूल न संबंधी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये पथनाट्याचे आयोजन ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेणे, रांगोळी आणि चित्रकलेच्या माध्यमातू न भ्रष्टाचार विरोधी संदेश जनतेपर्यंत पोहोचविणे ऑनलाइन सोशल मीडिया च्या माध्यमातून जनजागृती करणे असे विविध उपक्रम राबविले जात आहेत.
त्याअंतर्गत दिनांक 29 ऑक्टोबर रोजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी ऑनलाईन पद्धतीने या जनजागृती अभियानात सहभाग घेतला. मोठ्या संख्येने सर्व स्वयंसेवकांनी ऑनलाइन प्रतिज्ञा घेतली आणि त्याचे प्रमाणपत्रही मिळविले. तसेच भ्रष्टाचार विरोधी शपथ व्हाट्सअप आणि फेसबूक स्टेटस ला ठेवून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. 30 ऑक्टोबर रोजी महाविद्यालयात प्रातिनिधिक स्वरूपात काही स्वयंसेवक हजर राहून महाविद्यालयातील प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी यांच्या समवेत शपथ ग्रहण केली.
या कार्यक्रमाच्या वेळी महाविद्यालया चे प्रा.बी.बी. बारसे,प्रा. बी.एस.काळे प्रा.अरुण पिसे,रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. एम.एम. मून तसेच रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ हेमंत जोशी हे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. छाजेड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे ही सहकार्य लाभले.
0 Comments