आज 18/10/2021 रोजी विशेष पथक अवैध धंद्यांवर रेड करण्या कामी पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारा कडून खात्रीलायक बातमी मिळाली की एक महिंद्रा जितो कंपनीची मालवाहू गाडी MH 30 BD 0784 मध्ये अवैधरित्या गुटखा विक्रीसाठी कोठारी बाजार ते काला चबूतरा कडुन चांदेकर चौक कडे नेणार आहे.अश्या खात्रीलायक बातमी वर काला चबूतरा येथे नाकाबंदी करून संबंधित माळवाहू ला रोड चे एकीकडे थांबविले आणि त्यातील चालकाला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव आदिल खान फिरोज खान वय 30 रा. हिमायू रोड बैदपुरा अकोला, असे सांगितले.. त्याला गाडीत काय आहे विचारले असता त्याने गुटखा असल्याचे सांगितले...
त्यात (1)RJ कंपनीचे सुगंधित गुटख्याचे 260 पाकीट प्रत्येकी कीं.120रु. असा 31,200रु. चा माल (2)दबंग कंपनीचे सुगंधित गुटख्याचे 495 पाकीट प्रत्येकी कीं.300रु.असा 1,48,500 रु.चा माल (3)seven कंपनीचे सुगंधित गुटख्याचे 110 पाकीट प्रत्येकी कीं.300रु. असा 33,000रु. चा माल (4)गोवा 1000 कंपनीचे सुगंधित गुटख्याचे 55पाकीट प्रत्येकी कीं.300रु. असा 16,500रु. चा माल.. तसेच एक महिंद्रा जितो कंपनीची माळवाहू गाडी MH 30 BD 0784 कीं.अं.5,00,000 रुपये असा एकूण 7,29,200रुपये चा मुद्देमाल मिळून आला आहे..
त्याचे हे कृत्य गुटखा प्रतिबंद अधि. प्रमाणे होत असल्याने त्याचे विरुद्ध पो. स्टेशन सिटी कोतवाली अकोला येथे विविध कलमन्व्यये गुन्हा नोंदविन्यात आला आहे...
सदर कार्यवाही मा.पोलिस अधीक्षक जी श्रीधर साहेब अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील साहेब व त्यांच्या पथकाने केली
0 Comments