विशेष पथकाकडून विविध ठिकाणी अवैध दारू विक्री करणाऱ्यावर छापे...दोन दुचाकी सह 1,17,030 मुद्देमाल जप्त
आज दि, 16/10/21 रोजी विशेष पथक अकोला अवैध धंद्यावर रेड करणे कमी पेट्रोलिंग करीत असतांना खात्रिलायक खबर मिळाली की एक इसम पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेला हा दारू विक्री करिता बाळगत आहे अश्या बातमी वरून सरकारी गोडाऊन रोडच्या डावे बाजूला पांढरि पोतडी घेऊन संशईत उभा असलेल्या पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेला यास त्याचे जवळ जाऊन त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव नागेश भाऊराव पावसाळे वय 35 रा कौलखेड चौक अकोला असे सांगितले.. त्याच्या जवळील पांढऱ्या पोतडीची पाहाणी केली असता त्यात देशी दारू सखू संत्रा प्रीमियम 180मि. ली. चे 96 कवाटर एकूण किंमत 5,760रु. चा मुद्देमाल मिळून आला. त्याचे हे कृत्य महा. दा.अधी. अन्वये नुसार होत असल्याने त्याचे विरुद्ध पो. स्टेशन खदान येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे...
(2) तसेच रामदास पेठ हद्दीत अवैध धंद्यावर रेड करणे कमी पेट्रोलिंग करीत असतांना खात्रिलायक खबर मिळाली की एक इसम त्याचे दुचाकी गाडी लाल काळ्या रंगाची प्लेझर MH 30 W 3676वर विना परवाना देशी दारू घेऊन अग्रसेन चौककडून अकोट स्टॅन्ड मार्गे अकोट फाईल कडे जाणार आहे अश्या खात्रीलायक बातमीवरून संतोषी माता मंदिर चौक येथे नाकाबंदी करून सदर गाडी चालकास गाडी रोड च्या बाजूला घेऊन त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव शाम शांताराम अवचार वय 29 रा. आंबेडकर नगर बस स्टॅन्ड मागे अकोला असे सांगितले त्याच्या जवळील पोतडीची पाहणी केली असता त्यात देशी दारू सखू संत्रा प्रीमियम 180मि. ली. चे 192 कवाटर एकूण किंमत 11,520रु.तसेच दुचाकी गाडी लाल काळ्या रंगाची प्लेझर MH 30 W 3676 की. अं.50,000रु. ची असा एकूण 61,520 मुद्देमाल मिळून आला. त्याचे हे कृत्य महा. दा.अधी. कलम 65ई अन्वये नुसार होत असल्याने त्याचे विरुद्ध पो. स्टेशन रामदास पेठ येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे...
(3)तसेच अकोट फाईल हद्दीत अवैध धंद्यावर रेड करणे कमी पेट्रोलिंग करीत असतांना खात्रिलायक खबर मिळाली की एक इसम वल्लभ नगर कडे कावासाकी बजाज गाडी MH 30 का 9882 वर विना परवाना देशी दारू घेऊन येणार आहे अश्या खात्रीलायक बातमीवरून वल्लभ नगर फाट्या जवळ नाकाबंदी करून सदर गाडी चालकास गाडी रोड च्या बाजूला घेऊन त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव दुर्गेश विजय निंबाळकर वय 24 रा.शेलार फाईल, गुरुद्वारा जवळ अकोला असे सांगितले त्याच्या जवळील पोतडीची पाहणी केली असता त्यात (1)देशी दारू सखू संत्रा प्रीमियम 90मि.ली.चे 160 नग एकूण किंमत 4800रु. तसेच (2)देशी दारू टॅंगो पंच 90 मि.ली.चे 165नग एकूण किंमत 4950रु. (3)दुचाकी गाडी कावासाकी बजाज MH 30 K 9882 की. अं.40,000रु. ची असा एकूण 49,750रु.मुद्देमाल मिळून आला. त्याचे हे कृत्य महा. दा.अधी. कलम 65ई अन्वये नुसार होत असल्याने त्याचे विरुद्ध पो. स्टेशन अकोट फाईल येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे...
सदरची कारवाई ही मा.पो. अधीक्षक सा. जी. श्रीधर, मा. अप्पर पो. अधी. एम. राऊत मॅडम, यांच्या मार्गदर्शना खाली पो. नि. विलास पाटील सा. आणि पथकाने केली..
0 Comments