पोलीस आपल्या दारी मोहिमेला प्रचंड प्रतिसाद
अकोट तालुका प्रतिनिधी देवानंद खिरकर
अकोट तालुक्यातील ग्राम मुंडगाव येथे अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने एक गाव एक पोलीस या उपक्रमा अंतर्गत पोलीस आपल्या दारी हा कार्यक्रम राबविण्यात आला आहे.अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर.यांच्या संकल्पनेतून नुकतेच संपूर्ण जिल्ह्यात पोलिस आपल्या दारी ही योजना प्रत्येक पोलिस ठाण्यात राबविण्यात येत आहे.अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीणचे नवनियुक्त ठाणेदार नितीन देशमुख
यांनी पोलिस आपल्या दारी या उपक्रमाची संपूर्ण माहिती ग्रामस्थांना दिली.राज्यातील कायदा सुव्यवस्था, राज्याची भौगोलिक व्याप्ती,वाढलेली लोकसंख्या आणि तुलनेत अपुरे पोलीस बळ हे सर्व लक्षात घेता प्रायोगिक तत्वावर ' एक गाव - एक पोलीस 'ही संकल्पना राबवायला सुरुवात झाली आहे.अकोला जिल्ह्यांत हा प्रयोग सुरू झाला आहे. त्यामुळे नागरिक आणि पोलीस यांच्यात संपर्क राहणार असून ऐनवेळी उदभवलेल्या परिस्थितीमध्ये काम करणे सोपे जाणार आहे.
ग्रामीण भागात पोलीस कर्मचारी यांची कमतरता अधिक आहे.या पार्श्वभूमीवर एक गाव - एक पोलीस ही संकल्पना राबवण्यात येत आहे.गावात कुठल्याही छोटा मोठा वाद उद्भवलयास पोलिसांना तात्काळ कळवावे,अनेक वेळा महिलांवर अन्याय अत्याचार होतो,मात्र पोलिसांपर्यंत माहिती पोहचत नाही त्यामुळे अपराध घडतात,अशा वेळी पोलिसांना माहिती दिल्यास त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्यास मदत होईल.गावात कुठलाही अनुचित प्रकार घडला असल्यास पोलीस स्टेशनला तात्काळ फोनद्वारे माहिती द्यावी असे यावेळी सांगण्यात आले, यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच तुषार पाचकोर,पोलीस पाटील बाळकृष्ण भगेवार,तंटामुक्ती अध्यक्ष मंगेश दहिभात,देवेंद्र सोनटक्के,पत्रकार स्वप्नील सरकटे,संजय सपकाळ, विशाल गवई विलास इंगळे,अनिल नीमकळे यांची उपस्थिती होती तर अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे बिट जमादार मनाेज काेल्हटकर,पो. हे. कॉ.भास्कर सांगळे,खुपिया विभागाचे हिंम्मत दंदी यांची उपस्थिती होती.
0 Comments