न जीकच्या राष्ट्रिय महामार्गावरील कुप्रसिद्ध कलकत्ता ढाबा मधुन ७० हजार रुपयांच्या देशी विदेशी दारू तर जवळील वाशिंग सर्व्हिसिंग सेंटर मधुन १ लाख २५ हजार रूपये किंमतीचे अफुची फुले, अफूची पावडर व तलवार जप्त
बाळापूर पोलीस ठाण्याचा हद्दीतील रिधोरा नजीकच्या महामार्ग परीसरातील कुप्रसिद्ध कलकत्ता ढाब्याजवळ नशाखोरीचा मादक पदार्थाची हेराफेरी होत असल्याची याचे मार्फत समजताच क्षणाचाही विलंब न करता अकोला एटीएस दल पथकाने दक्ष होऊन घटनास्थळ गाठुन छापामारी, चौकशी सत्र राबविले असता मादक पदार्थाचे मोठे घबाळ दिसुन आले.यामध्ये अफूची फुले, अफूची पावडर , २० हजार रू. किमतीचा डोडा नावाचा नशीला पदार्थ, १ हजार रू. किंमतीची तलवार, ३८,८०० रू. किंमतीची देसी दारूचे १० बॉक्स, ३० हजार रुपए किमतीची विदेशी दारू, ३५ हजार रुपय किमतीचा मोबाइल अशाप्रकारे एकुण १ लाख २५ हजार रुपयांचा अवैध माल जप्त करण्यात आलेला आहे.
सदर प्रकरणी पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहीतीनुसार आरोपी बालाजी शेषराव पाटिल (वय २४), रा. मांडणी, जवळ तथा मधुकर मुंडे (वय ५३) रा. रिधोरा या दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतलेले असुन त्यांचे विरूध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अतिरिक्त पुलिस अधीक्षक मोनिका राऊत के मार्गदर्शन में पुलिस निरीक्षक विलास पाटिल व त्यांचा पथकांनी केली.
अजुनही अकोल्या जिल्ह्यात काही हॉटेलस मध्ये चोरी छुपे अवैध धंदे चालु असल्याची चर्चा रंगत आहे.
0 Comments