शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची श्रम श्रीमंती शेतकऱ्यांच्या शेतात मोफत मशागत,अभिनव उपक्रम....
देवानंद खिरकर अकोट -
तालुक्यातील मुंडगाव जि प सर्कल अंतर्गत येणाऱ्या विविध गावातील शेतकऱ्यांच्या साठी खरीप हंगाम हा महत्त्वाचा आहे.मात्र अनेक शेतकरी कोरोना काळात शेती मशागत करण्यासाठी आर्थिक बाबतीत कमकुवत ठरत आहेत.नेमकी हीच बाब हेरून आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला राष्ट्रवादी युवक कांग्रेस धावून गेली आहे.मुंडगाव सर्कल अंतर्गत गरीब शेतकऱ्यांना मोफत शेतीसाठी मशागतीची कामे चक्क ट्रॅक्टर द्वारे करून देण्यात येत आहेत. जगाच्या पोशिंदा साठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आपले श्रम व यंत्रसामुग्री शेतकऱ्यांना मोफत देऊ शेतीची मशागत करणे सुरू केले आहे.या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे .
अकोट तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राम म्हैसने व रा.काँ.चे तालुका सहसचिव कैलास थोटे यांच्या अभिनव संकल्पनेतून शेतकऱ्यांना मोफत मशागती चा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या अनुषंगाने येथील मारोती माहाराज संस्थांमध्ये शुभारंभाचा छोटेखानी कार्यक्रम घेऊन या शेती मशागतीच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
0 Comments