Header Ads Widget

Responsive Image

भडगाव वाळु माफियाची तलाठीस शिवीगाळ करून मारहाण गुन्हा दाखल

भडगाव :- जळगाव ( खान्देश )

   वाळू चोरीचा गुन्हा माझ्यावर का दाखल केला होता. याचा राग मनात ठेवत आज भररस्त्यात दोन वाळू माफियानी तलाठीची गाडी अडवत तलाठीला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना वडजी फाट्याजवळ घडली असून या बाबत दोन वाळू माफिया विरूद्ध भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील वडजी येथील तलाठी-विलास पांडुरंग शिंदे वडजी येथे आज तहसिलदार यांच्या उपस्थितीत शासकीय योजनांचा कॅम्प आयोजित केला होता. हा कॅम्प आटोपून त्याचा रिपोर्ट देण्यासाठी तहसील कार्यालय येथे जात असताना वडजी फाटा जवळ दुपारी साडेबारा वाजता संजय त्रिभुवने व त्याच्या सोबत एक अनोळखी हे त्यांच्या गाडीने मागून येऊन माझ्या गाडीचा रस्ता थांबवला व गाडी थांबतच खाली उतरला व मला म्हणाला की, तू माझ्यावर गुन्हे दाखल का केले? असे बोलून माझ्या अंगावर धाऊन आला व मला छातीवर, डोक्यावर चापटा बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली व माझ्या अंगावरील शर्टाची ओढताना करताना बटणे तोडली व बनियान फाडून तुला परत पाहून घेईल अशी धमकी दिली तसेच त्याच्या सोबत असलेला अनोळखी ने माझ्या मोटार सायकल ला लाथ मारून खाली पडली व तेथून दोघेही पसार झाले म्हणून तलाठी विलास पांडुरंग शिंदे यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिस स्टेशनला आरोपी – संजय सुरेश त्रिभुवने रा. वाक व त्याच्या सोबत एक अनोळखी अश्या दोघांविरुद्ध भाग ५ गु.र.न.१३९/२०२१ कलम ३५३,३३२,३४१,३५२,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. कैलास गीते हे करीत आहे.

Post a Comment

0 Comments