समाजकल्याण चां स्तुत्य उपक्रम
आडगावं बु. प्रतिनिधी सौ.खुशाली निमकडेॅ,आडगांव बु
समाजकल्याण विभागाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड महिला सबळीकरण व स्वाभिमान योजने अंतर्गत तेल्हारा तालुक्यात अडगाव बु येथील तीन महिलांना बागायती शेतीचे वाटप करण्यात आले...याप्रसंगी सदर शेतीचा ताबा मिळताच कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की आपल्या नावाने सातबारा होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत लाभार्थी महिलांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली..
समाजकल्याण विभागाच्यावतीने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतील पात्र लाभार्थ्यांकरीता अडगाव बु शेतशिवारात साडेपाच एकर बागायती शेती खरेदी करुन जिल्हास्तरीय निवड समितीने निवड प्रक्रिया राबवून ईश्वर चिठ्ठी (टोकण) द्वारे तीन लाभार्थ्यांची निवड केली. त्यात एक परीतक्त्या व दोन विधवांची निवड झाली.यात परीतक्त्या भिमकन्या वसंत धाबे 0.80 आर, विधवा मंगला संतोष अंभोरे 0.80 आर व चंद्रकला भाऊराव सावळे 0.60 आर अशाप्रकारे लाभ देण्यात आला.. ईश्वर चिठ्ठी ने निवड झालेल्या लाभार्थींना सहायक आयुक्त समाज कल्याण अधिकारी पियुष चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ समाजकल्याण निरीक्षक सुसतकर,समाजकल्याण निरीक्षक श्रीमती उमा जोशी,कनिष्ठ लिपीक पराते,लांडगे यांचे हस्ते आदेशाची प्रत देण्यात आली....
समाजकल्याण विभागाच्या वतीने लाभार्थी महिलांना सदर शेतीची आज रीतसर मोजणी करून त्यांना शेतीचा ताबा देण्यात आला.यावेळी माजी सभापती गोपाल कोल्हे,माजी सरपंच अशोक घाटे, मंगलसिंग डाबेराव , माजी उपसरपंच महेबुखॉ पठाण, मंडळ अधिकारी नंदकिशोर पवार, पोलिस पाटील हितेश हागे, सामाजिक कार्यकर्ते महादेव सावळे यांची प्रमुख उपस्थिती होती ग्राम पंचायत ने पाठविलेला प्रस्ताव व केलेल्या पाठपुराव्यामुळे आम्हाला लाभ मिळाल्याची भावना लाभार्थी महिलांनी व्यक्त केली.
**
मनोगत
आपण या जन्मात शेतीचे मालक होवू आपल्या नावाने सातबारा होईल याचा कधी विचार ही आमच्या मनात आला नाही परंतु शासनाच्या समाजकल्याण विभागातील योजनेमुळे आमचे आयुष्य च बदलून गेले..... भिमकन्या वसंत धाबे, मंगला संतोष अंभोरे, चंद्रकला भाऊराव सावळे.
**
मनोगत :
अनुसूचित जातीतील दारिद्ररेषे खालील भुमिहीन शेतमजूर कुटुंबांना उत्पन्न स्त्रोत उपलब्ध होऊन त्याचे राहणीमानात बदल व्हावा, त्यांचे मजुरीवरील अवलंबीत्व कमी होऊन त्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे याकरिता 100 टक्के अनुदानावर पात्र लाभार्थ्यांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेत लाभ दिल्या जात आहे. ... श्रीमती उमा जोशी समाज कल्याण निरीक्षक अकोला
0 Comments