Header Ads Widget

Responsive Image

नवीन रेशनकार्ड धारक यांना त्वरित मोफत धान्य देण्याची मागणी

नवीन रेशनकार्ड धारक यांना त्वरित मोफत धान्य देण्याची मागणी

सध्या संपुर्ण राज्यात कोविड 19 च्या कोरोना महामारीने थैमान घातले आहे अश्यातच भरपुर लोकांचे काम गेली जगण्याचा यक्ष प्रश्न त्यांचा समोर येऊन उभा राहिला आहे.
 इकडे सरकारने मोफत धान्य योजना राब वली आहे परंतु खरंच त्यांना मिळत कां ?
ज्यांनी नवीन 2 ते 3 हजार रुपये देऊन रेशन कार्ड बनविली त्यांनाच रेशन मिळत नाही आहे त्यांचा परिवारा वर उपासमारीची वेळ आली आहे.
 अन्न पुरवठा विभागाने प्रत्येक रेशन दुकाना त एक बोर्ड लावावा रेशन दुकान केव्हा उघडेल केव्हा बंद होईल,कोणाला किती धान्य मिळते, ते म्हणजे यांचा काळा बाजार थांबेल व जनतेलाहि सरकार नियमावली प्रमाणे धान्य मिळेल.
रेशन दुकानदाराची मनमानी 

 अकोल्याचा बस स्टॅन्ड मागील आंबेडकर नगर मधील रेशन दुकान नं.125 दुकानदार जयमीना इंगळे यांचे पती याला अपवाद आहेत जेव्हा वाटेल तेव्हा दुकान उघडणे, त्यांचा सोई नुसार लोकांना बोलावाने, धान्य कमी देणे कार्डात नाव असुन काहीही कारणाने धान्य न देणे, जेव्हा वाटेल तेव्हा दुकान उघडणे असे प्रकार या दुकानात चालु आहेत.
 या अगोदर देखील स्थानिक नागरिकांनी त्यांची तक्रार केली आहे परंतु त्यावर अधिकारी यांनी काहीच ऍक्शन घेतलेली दिसुन आलेली नाही म्हणुन त्यांचीं हिम्मत वाढली आहे.
  तरी कृपया अन्न पुरवठा विभागाने यांची एक बोर्ड किंवा पेपर मध्ये जाहिरात देऊन नागरिकांना जागृत करावे व सरकारने मोफत धान्य नेमके कोणाला देण्यासाठी हि योजना राबावली आहे तेवढी जनजागृती करणे महत्वाचे आहे. जेणे करून नागरिकां मधील सभ्रम दूर होईल.
  व सर्वांनां या योजनेचा लाभ मिळेल 

Post a Comment

0 Comments