Header Ads Widget

Responsive Image

अकोल्याचे ३० बालवैज्ञानिक विद्यार्थी निघाले इसरो वारीला.......जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दाखवली हिरवी झेंडी

अकोला :- आझाद नायक न्युज
मुकेश भावसार
 दि १५: विज्ञानवेध उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ३० बाल वैज्ञानिक विद्यार्थी इसरो अभ्यास दौऱ्या करीता रवाना झालेत यावेळी जिल्हाधिकारी वर्षा मीना,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम,उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार आदी उपस्थित होते.
 १५ ते २१ डिसेंबर सात दिवसाच्या दौऱ्यामध्ये विद्यार्थी विमानाने बंगलोर नंतर श्रीहरीकोटा येथील इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, मैसूर पॅलेस , हैद्राबाद येथील सालारजंग म्युझियम, गोवळकोंडा चा किल्ला, रामोजी फिल्म सिटी व इतर स्तळांना भेट देणार आहेत.
 विज्ञाना सोबतच इतिहासाला जाणून घेण्याची संधी या निमित्ताने प्राप्त झालेली आहे.विद्यार्थी इसरो वारीसाठी रवाना होत असताना विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments