Header Ads Widget

Responsive Image

पोषण सप्ताहा निमित्त अंगणवाडी केंद्रात वृक्षारोपण व विविध कार्यक्रम संपन्न....

अकोला, दि. १ : - मुकेश भावसार 
   राष्ट्रीय पोषण सप्ताहानिमित्त संपूर्ण सप्टेंबर महिन्यात जिल्ह्या तील सर्व अंगणवाडी केंद्रांवर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे त्याचा शुभारंभ अंगणवाडी केंद्रांवर वृक्षारोपणाद्वारे करण्यात आला.
  पोषण सप्ताहानिमित्त 'आईच्या नावे लावू एक झाड' हा उपक्रम राबविण्यात आला. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी यांच्या हस्ते शनिवारी शेळद येथील अंगणवाडी केंद्रावर वृक्षारोपण करण्यात आले.
राष्ट्रीय पोषण सप्ताहात राबवण्याच्या विविध उपक्रमांबाबत श्रीमती वैष्णवी यांनी मार्गदर्शन केले. 
यावेळी त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यां शी  संवाद साधून वृक्षारोपण व पोषण आहाराचे महत्त्व याविषयी माहिती दिली. 
उपमुख्य कार्यकारी अधिकारी         ( बालविकास) राजश्री कोलखेडे यांनी मनोगत व्यक्त केले प्रकल्प अधिकारी भारती लांडे यांनी प्रास्ताविक केले. 
यावेळी ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस व गावकरी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments