सुमिरमा फाउंडेशन द्वारा शेवटचा श्रावण सोमवार दिनांक 02/09/2024 रोजी सकाळी 11.00 वाजे पासून गांधी रोड येथे भव्य औषधी वाटप....
दर वर्षी श्रावण महिन्यात कावड व पालखी यात्रा अकोला येथे जल्लोषात साजरी करण्यात येते. गांधिग्राम येथून राजराजेश्र्वर मंदीरा पर्यंत पायी वारी केली जाते यादरम्यान आपल्या सर्व शिव भक्तांना काही त्रास होत असल्यास आरोग्य विषयी काही अडचण निर्माण झाल्यास त्यांना वेळेवर औषधोपचार मिळावा यासाठी सुमिरमा फाउंडेशन दरवर्षी गांधी रोड येथे मोफत औषधांचे वाटप करत असते याचसोबत शिवभक्तांना इजावगैरे झाली तर ड्रेसिंग सुद्धा करून देण्यात येते.
यंदाही हा उपक्रम राबविला जात आहे तरी या सेवेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी सुमिरमा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्षा डॉ. पुजा सुमित्रा रमाकांत खेतान व संपूर्ण टीम तर्फे आपणास विनंती...
याचसोबत या सेवेत कोणाला सहभागी व्हायचे असल्यास खालील नंबर वर संपर्क करावा असे आवाहनसंस्थापक अध्यक्षा डॉ. पुजा सुमित्रा रमाकांत खेतान व संपूर्ण टीम तर्फे करण्यात आले 9096655600
0 Comments