हिवरखेड :- आझाद नायक न्युज धिरज बजाज
वान धरणाचे पाणी पळविण्याच्या निषेधार्थ लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल दादा गावंडे यांचे अनेक दिवसांपासून वारी धरणावर धरणे आंदोलन सुरू आहे. त्याला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून आज दिनांक 25 एप्रिल रोजी संपूर्ण तेल्हारा तालुक्यासह हिवरखेड शहर बंदची हाक देण्यात आली होती. त्याला समस्त व्यापारी संघटनेने उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवित हिवरखेड शहर कडकडीत बंद पाळण्यात आले आहे.
शासनाने अकोला अमृत योजना तसेच बाळापूर 69 खेडी पाणीपुरवठा योजनेचा निर्णय कायमस्वरूपी रद्द करावा या मागणीसाठी सदर आंदोलन सुरू असून याला सर्व स्तरातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.
0 Comments