Header Ads Widget

Responsive Image

सख्या मुलीवर केला बापाने जबरी अत्याचार....विविध कलमान्वये दिली जन्मठेपेची शिक्षा

सख्या मुलीवर केला बापाने जबरी अत्याचार....

बाप - लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना....

अकोला :- आझाद नायक न्युज बाळापूर तालुक्यातल्या उरळ पोलीस स्टेशन हद्दीतील वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबात बाप-मुलीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी उजेडात आली. दरम्यान, या गावात मागील वर्षी १४ ऑगस्ट २०२१ रोजी ४५ वर्षीय बापाने पोटच्याच १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरी लैंगिक अत्याचार केला.

हा प्रकार आई, भावाला सांगितल्यास तुला आणि तुझ्या आई, भाऊ यांना देखील जीवे मारुन टाकेल, अशी धमकीही दिली.
त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीने तिच्या शेजारी राहणाऱ्या काकुला हा प्रकार सांगितला. त्यांनी आईला बोलावले आणि उरळ पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर अत्याचार करणाऱ्या ४५ वर्षीय बापाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.
या तक्रारीनंतर पोलिसांनी पोस्को कायद्यांतर्गत ३७६/३७६ (२) (एल), ३७६(२) (एन), ३७६(३), ५०६ सहकलम ४, ५, (एल)(एन), ६,७,८ नुसार गुन्हा दाखल केला. तसेच, अत्याचार करणाऱ्या बापालाही पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास उरळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंतराव वडतकर यांनी केला. पोलीस तपासात असेही निष्पन्न झाले की आरोपी हा गुन्हेगार प्रवृत्तीचा असून यापूर्वी त्याला एका विनयभंग प्रकरणात २ वर्षाची शिक्षा झालेली आहे. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता प्रकरणाचा काळजीपूर्वक तपास करण्यात येऊन दोषारोपत्र सादर केले.
या प्रकरणात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले असून न्यायालयाने आरोपीला विविध कलमान्वये जन्मठेपे ची शिक्षा ठोठावली आहे, व पाच लाख वीस हजार रुपयांचा दंड सुनावला. हे प्रकरण न्यायालयात सादर झाल्यापासून १३ महिन्यात निकाली काढण्यात आले. पैरावी म्हणून पोलीस स्टेशनचे ASI ढोकणे व सहाय्यक सरकारी अभियोक्ता किरण खोत यांना सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments