स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने अमळनेरच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी हजारो नागरिकां नी,शाळकरी विदयार्थ्यांनी खान्देश रक्षक ग्रुप व आजी माजी सैनिक फाउंडेशन तसेच विविध संस्थानी क्रांतिकारी यांना मानवंदना देण्यात आली .
देशात स्वातंत्र्याचे ७५ वर्ष विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेर नगरपरिषदेतर्फे माझी वसुंधरा या उपक्रमांतर्गत लोकसहभागातून पर्यावरण संरक्षणाची शपथ घेण्यात आली. ही शपथ तिरंगा चौकात घेण्यात आली.
याप्रसंगी तिरंगा चौक गर्दीने फुलून गेला होता.यावेळी शासकीय,निम शासकीय,विविध शाळा, सामाजिक संस्था,महाविद्यालये, खान्देश रक्षक ग्रुप, व आजी माजी सैनिक फाउंडेशन, अमळनेर तसेच अमळनेर मधील तमाम हिंदु - मुस्लिम जन समुदाय यांच्यासह सुमारे हजारोच्या संख्याने नागरिकांनी व अबाल वृद्ध व शालेय विद्यार्थी - विदयार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.यात देशासाठी प्राणाची बाजी लावलेल्या शूर क्रांतिकारीनां मानवंदना देण्यात आली. तर मंगळदेव ग्रह मंदिरात 11:00 वाजेच्या भोंगा वाजल्यानंतर भाविकांनी राष्टगीताने आदरांजली वाहण्यात आली.
0 Comments