Header Ads Widget

Responsive Image

श्री मंगळदेव ग्रह मंदिरात विविध रंगी व दुर्मिळ रोपे असलेल्या गुलाबबागेचे लोकार्पण

आझाद नायक न्युज प्रतिनिधी

श्री मंगळदेव ग्रह मंदिरात विविध रंगी व दुर्मिळ रोपे असलेल्या गुलाबबागेचे लोकार्पण


येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिर परिसरातील प.पू. संत सखाराम महाराज रोपवाटिकेत स्व. जेवतबाई लोढा यांच्या स्मरणार्थ कैलास लादूलालजी लोढा परिवारातर्फे नुकतेच विविध रंगी व दुर्मिळ रोपे असलेल्या गुलाबबागेचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी लोढा परिवारासह जळगाव वकील संघाचे नवनियुक्त अध्यक्ष तथा जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. दिलीप मंडोरे, अमळनेर उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव सरकारी वकील राजेंद्र चौधरी, ॲड.किशोर बागुल व ॲड. शशिकांत पाटील यांच्यासह ॲड.प्रदीप भट,ॲड.सुरेश सोनवणे मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील,सचिव एस.बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, सेवेकरी उज्ज्वला शहा,सुनीता कुलकर्णी,विनोद अग्रवाल विनोद कदम, व्ही. व्ही. कुलकर्णी, आर. जे. पाटील, उमाकांत हिरे, राहुल पाटील, संस्थेचे ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील, बांधकाम कन्सल्टंट संजय पाटील आदींसह अनेक पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments