येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत १९५ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, सुमारे तीन कोटी ३३ लाखांची वसुली करण्यात आली आहे.
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात नुकतीच लोकअदालत घेण्यात आली. त्यात कौटुंबिक वादाची ८१७ प्रकरणे दाखल करण्यात आली होती. त्यातून ११३ प्रकरणे न्यायालयाने सोडविले असून, त्यातून दोन कोटी ४८ लाख ८४ हजार ९४७ रुपयांची वसुली करण्यात आली. तर शहरातील विविध बँकेच्या ग्राहकांकडे असलेल्या थक बाकीचे सुमारे २ हजार २४७ प्रकरणे सुनावणीसाठी आली होती. त्यात ८२ प्रकरणांची सुनावणी करण्यात आली असून, त्यातून ८३ लाख २२ हजार ५५४ रुपयांची वसुली करण्यात आली. लोकअदालीत तीन हजार ६४ प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी सुमारे १९५ प्रकरणे निकाली काढण्यात येऊन त्यातून सुमारे तीन कोटी ३२ लाख ७ हजार ५०१ रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तर कोरोना काळातील तीन वर्षांपूर्वीची दोन कौटुंबिक प्रकरणे तसेच चालूचे एक प्रकरण अशा तीन कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले.
लोकअदालतीचे पॅनलप्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश एस. बी. गायधनी, जिल्हा न्यायाधीश पी. आर. चौधरी, दिवाणी न्यायाधीश पी. पी. देशपांडे, न्यायाधीश एस. एस. अग्रवाल, एस. एस. जोंधळे, ए. यू. यादवसह दिवाणी न्यायाधीश वर्ग क हे होते.तर ॲड.डी.पी. परमार,ॲड. एस. के.ससाणे ॲड.जे.यु.बडगुजर,ॲड. पौर्णिमा महाजन,ॲड.के.ए. साळुंखे,ॲड.ए.ए. पठाण हे पॅनलप्रमुख होते तर ॲड. किशोर बागूल, शशिकांत पाटील, राजेंद्र चौधरी हे सरकारी वकील उपस्थित होते.
तालुका विधी सेवा समितीचे सुनील पाटील,संदीप सोनवणे, अधीक्षक पी. वाय. पाटील यांनी सहकार्य केले.
0 Comments