अमळनेर :- विक्की भावसार
गुरुपौर्णिमा निम्मित अमळनेर येथिल भावसार समाजातर्फे पानखिडकी भागातील भावसार मढीत अनेक वर्षांची परंपरा कायम ठेवीत गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम समाज बांधवानी एकत्रित येऊन उत्साहात पार पाडला.
यात सर्व प्रथम श्री. हिंगलाज देवीच्या आरती ने सुरवात झाली. त्या नंतर संत खुशाल महाराज, फुलनाथ महाराज , गणेशनाथ महाराज , संजनाथ महाराज, आदी गुरुवर्यांची पुजा आरती कार्यकारिणी मंडळातर्फे करण्यात आली.

यावेळी लहान बाळाकांचाही समावेश होता भजन,कीर्तन आरती व महाप्रसाद वाटपाने विविध कार्यक्रमाने गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम समाजाच्या कार्यकारी मंडळाने उत्साहात पार पाडला.
0 Comments