कधी सुधारतील अकोल्यातील वाहन चालक........
सर्व जबाबदारी काय वाहतूक पोलिसांचीच काय ?
भर उन्हात, पावसात, वादळात, आपली ट्राफिक व्यवस्था चोखपणे पार पडणाऱ्या वाहतुक पोलिसांना सहकार्य करा.
उड़ान पुल हा नागरिकांच्या सुविधेसाठी बनला असला तरी अकोल्यातील बेशिस्त वाहनांचे चालक यांचे वर्तणुकीत कुठलीही व काहीही सुधारणा होत नाही आहे.
वाहतूक पोलिसांनी वाहने कोणत्या मार्गाने पुलावर घेऊन जावे व कोणत्या मार्गानी खाली उतरावे पुलावर वाहने विनाकारण पार्क करू नये.
याकरिता सूचना फलक लावलेत व ते लोकांना समझले नाहीत म्हणून मराठी भाषेत ही सूचना फलक ही पुन्हा लावले तरीही अकोल्यातील बेशिस्त वाहनाचे चालक हे सूचना फ़लक निर्देशांचे पालन न करता उल्लंघन करतानाच दररोज शेकडो वाहनावर वाहतूक पोलिस कार्यवाही करूनही वाहन चालकामध्ये सुधारणा होताना दिसून येत नाही आहे.
वाहन कायद्याच्या दण्डास चालक जुमानत नसल्याचे वारंवार दिसून येत असल्याने उद्यापासुन जेही वाहनाचे चालक उड्डाण पुलावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करतील त्यांचे वाहनावर जप्तीची कार्यवाही वाहतूक पोलिस हे करणार आहेत त्यासाठी उद्यापासुन उड्डाण पुलावर 4 वाहतूक अमलदार यांची नेमणुक करण्यात आलेली आहे.
करिता सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे व जबबदारीचे आहे.
अन्यथा मोठा प्राणान्तिक अपघात घडून चांगल्या उपक्रमास गालबोट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
असे आवाहन पोलिस निरीक्षक विलास पाटील शहर वाहतूक नियंत्रण शाखा ययांनी केलेले आहे.
0 Comments