Header Ads Widget

Responsive Image

अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयात प्रॅक्टिकल सुरु असतांना Msc च्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू


अमळनेर प्रताप महाविद्यालयात प्रॅक्टिकल सुरु असतांना विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात पदव्युत्तर एमएससीच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याचा आज प्रॅक्टिकल सुरू असतानाच दुर्दैवी मृत्यू झाला. निलेश झांबरलाल पाटील असे या विद्यार्थ्याचे नाव होते. निलेश चक्कर येऊन खाली पडताच मित्रांनी आरडाओरड केली असता तात्काळ विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी धावत आले. व निलेशला सर्वांनी अमळनेर येथील डॉ. बहुगुणे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र तेथे डॉ. बहुगुणे यांनी तपासणी केली असता तो मृत झाला होता.तेथे डॉ. बहुगुणे यांनी निलेशला मृत घोषित केले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात बॉडी शवनिच्छेद नासाठी पाठवण्यात आले असता डॉ. आशिष पाटील यांनी शवनिच्छेदन केले. निलेशचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती शवविच्छेदनातुन समोर आली आहे.

निलेश सकाळ पासून चिंतेत असल्याचे त्याच्या मित्रांनी संगीतले. मनमिळाऊ व अभ्यासू मित्र गमावल्याने निलेशच्या मित्रांनी दुःख व्यक्त केले.

निलेश पाटील हा पिंपळे रोड, अमळनेर येथे परिवारासोबत राहत होता. निलेशचे वडील भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त कर्मचारी असून ते सध्या महावितरण कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्याच्या जाण्याने परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


Post a Comment

0 Comments