अकोला जिल्हा पोलीस दलाकडुन विविध उपक्रम राबविले जातात त्यापैकी आज दिनांक २१.०४. २०२२ रोजी पोलीस अधीक्षक जि. श्रीधर यांचे संकल्पनेतुन "सर्व धर्म सद्भावना संमेलन'या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. जातीय सलोखा वृध्दींगत व्हावा सर्व धर्मांची खरी शिकवण प्रत्येका पर्यंत पोहचावी जेणेकरुन जातीय दंगली घडणार नाही व दहशतवादाला थारा मिळणार नाही या हेतुने दिनांक २१.०४.२०२२ ते ३०. ०४.२०२२ पर्यंत हा उपक्रम प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर राबविण्यात येणार आहे. सदरच्या उपक्रमामध्ये सर्व धर्म समभाव या विषयावर गुरुदेव सेवा मंडळ च्या सर्व धर्मिय सामुदायीक संमेलनाचे आयोजन करून सर्व धर्मिय धर्मगुरू यांचे विशेष हस्ते मार्गदर्शन करण्यात येणार असुन “सर्व धर्माची शिकवण एकच' हा संदेश सर्व जनतेपर्यन्त पोहचविण्याचा मानस अकोला पोलीसांचा आहे.
- पोलीस लॉन अकोला येथे सदर कार्यक्रमाची सुरुवात ही पाहुण्याच्या स्वागताने झाली पोलीस अधीक्षक जि. श्रीधर यानी कार्यक्रमाची रूपरेषा सोबतच कार्यक्रमाचा उद्देश सामाजिक बांधीलकी कशी जोपासता येईल या विषयावर प्रकाश टाकला नंतर सर्व धर्मिय सामुदायीक प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर सर्व धर्माचे गुरु शेख गुरूजी गुरूदेव सेवा मंडळ, हभप सुनिल महाराज लांजुळकर भागवताचार्य देवरी, श्रीकृष्ण सावळे गुरुजी गुरुदेव सेवामंडळ, फादर मोसेस वानखडे - इलोहिम अलायन्स चर्च, मुक्ती गुफराण, भन्ते धम्मानंद, डॉ. हरमीतसींग मल्होत्रा - कथावाचक गुरुव्दारा अकोला, फादर संजयबोधक-माउंट कारमेल कॅथेलीक चर्च अकोला यांनी राष्ट्रीय एकात्मता, सर्व धर्माची शिकवण एकच, जातिय सलोखा, बंधुभाव या विषयावर मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाला सौरभ कटीयार - कार्यकारी अधीकारी जि.प.अकोला निलेश अपार उपविभागीय दंडाधीकारी अर्जुना सर -आय एफ एस,वन विभाग, विजय कासट - कार्यकारी अभियंता महावितरण यांची विशेष उपस्थिती होती. - -- -
सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मोनिका राऊत अपर पोलीस अधीक्षक, यांनी केले. संचालन पो.ना. गोपाल मुकुंदे यांनी केले, सुभाष दुधगावकर- उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग तसेच अकोला शहरातील सर्व ठाणेदार, शांतता समिती सदस्य, शहरातील प्रतिष्ठीत महिला व पुरुष पत्रकार बांधव यांची उपस्थिती होती.
0 Comments