सदगुरु संत सखाराम महाराज यात्रा उत्सव निमित्त आझाद नायक न्युज तर्फे अमळनेर नगरपालिका प्रशासनास विनंती
2 वर्ष कोरोना काळात गेल्याने या वर्षी कोरोना चा प्रभाव कमी झाल्यामुळे या वर्षी सण यात्रा उत्सव मोठ्या थाटात साजरे होत आहे.
खान्देशची शान अमळनेर शहराची यात्रा म्हणजे सदगुरु सखाराम महाराज यांची यात्रा रथ व पालखी हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो
गेल्या 2 वर्षा पासून कोरोनामुळे यात्रा उत्सव बंद होता पण या वर्षी यात्रा उत्सव होणार आहे १९ दिवसांनी अमळनेरात ३ मे पासुन यात्रा उत्सव सुरू होत असुन दि. १२ मे रोजी रथ उत्सव आहे.
नगरपालिका प्रशासनाला एक विंनती आहे की दगडी दरवाजाचा कामाला गती देण्यात यावी. पानखिडकी, वाडी चौक, पानखिडकी भागातील फरशी पुला पासुन ते समाधी स्थळापर्यंत, दगडी दरवाजाचा आजूबाजूचा परिसर साफ करण्यात यावा व रथ व पालखी ज्या मार्गानी जाते त्या मार्गावर रस्ता बरोबर करण्यात यावा डांबरी करण करण्यात यावे ही विनंती आझाद नायक न्युज व परिसरातील नागरिक करीत आहे.
0 Comments