Header Ads Widget

Responsive Image

विलास पाटील यांची धडाकेबाज कारवाई.....अवैध गुटखा बाळगणाऱ्या वर कार्यवाही


विशेष पथकाची ग्राम आलेगाव येथे शाळे जवळ अवैधरित्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यावर धाड

आज दि : २०/१०/२०२१ रोजी विशेष पथक मा पोलीस अधीक्षक जी श्रीधर साहेब यांच्या आदेशानुसार पो स्टे चांनी हदित अवैध धंद्यांवर रेड़ करण्या कामी पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारा कडून खत्रिलायक बातमी मिळाली की ग्राम आलेगाव येथे एक इसम जिल्हा परिषद शाळा आलेगाव जवळ आपल्या पानटपरीवर अवैध रित्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखू पदार्थ बाळगून त्याची विक्री करीत आहे तेथे धाड टाकली असता एक इसम प्रशांत अश्रू पायघन रा. आलेगाव हा आपल्या पान टपरी वर अवैध रीत्या सुगन्धित तंबाखू पदार्थ बाळगून त्याची विक्री करताना मिळून आला त्याच्या जवळून सुगंधित जर्दा तंबाखू चे ५०० पॅकेट किंमत ४,९५० रू. ब्रिस्टॉल सिगरेट चे तीन पॅकेट ६०० रू.बिडी चे पाच पॅकेट किंमत ५०० रू असा एकूण ५,०५० रू चा मुद्देमाल जप्त करून त्याच्या विरुद्ध COTPA ॲक्ट अन्वे पो. स्टे.चान्नी
येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे

सदर कार्यवाही मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील साहेब व त्यांच्या पथकाने केली

Post a Comment

0 Comments