Header Ads Widget

Responsive Image

आरोग्य विभागाच्या परीक्षेकरीता स्थानिक विद्यार्थ्यांना जिल्हाअंतर्गत परीक्षा केंद्र द्या - उमेश इंगळे



आरोग्य विभागाच्या परीक्षेकरीता स्थानिक विद्यार्थ्यांना जिल्हाअंतर्गत परीक्षा केंद्र द्या - उमेश इंगळे

अकोला आझाद नायक (प्रती.)

   राज्यात आरोग्य विभागाच्या विविध पदासाठी परीक्षा होणार आहेत परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना जवळच्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्र मिळण्याची आशा होती.
 
तसेच परीक्षा फॉर्म भरताना त्यांनी त्या परीक्षा फॉर्ममध्ये जवळपास असलेल्या जिल्ह्याची परीक्षेसाठी निवड केली होती मात्र अकोला जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना राज्याबाहेरचे तसेच महाराष्ट्रात खूप दूरवरचे परीक्षा केंद्र मिळाले आहे त्यामुळे आरोग्य विभागाचा गोंधळ कारभार परीक्षा सुरू होण्या अगोदरच चव्हाट्यावर आला असून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे राज्य सरकारच्या आरोग्य विभागात होणारी गट क आणि ड वर्गाची परीक्षा सुरुवातीला ८ आणि ९ सप्टेंबर ला होणार होती ६१८५ पदांसाठी ही भरती परीक्षा होणार आहे.
 
आता ही परीक्षा २५ सप्टेंबरला गट क आणि २६ सप्टेंबर ला असल्याची माहिती आरोग्य विभागा कडुन देण्यात आली ,परीक्षा होणार असल्याने परीक्षेची प्रवेश पत्र कधी मिळणार याची ही वाट विद्यार्थ्यांना पहावी लागली विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश पत्र मिळाले मात्र परीक्षा केंद्र महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात देण्यात आली परीक्षा केंद्र राज्य बाहेर असल्याचे पाहताच विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे आणि विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारे परीक्षेचे प्रवेश पत्र प्राप्त झाले आहेत काही विद्यार्थ्यां च्या प्रवेश पत्रावर परीक्षा केंद्राचे व शहराचे नाव नाही तर काही विद्यार्थ्यांना राज्या बाहेरील परीक्षा केंद्र देण्यात आले आहे विद्यार्थ्यांन कडुन ६००/७०० ₹ परीक्षा फी आकारण्यात आली होती व आता जिल्ह्याबाहेर व राज्याबाहेरील परीक्षा केंद्र देण्यात आले यामुळे आरोग्य विभागाचा गोंधळ कारभार चव्हाट्यावर आला असुन परीक्षा सुरू होण्यापूर्वी पाहावयास मिळत आहे त्यामुळे  स्थानिक विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्यातील तालुका स्तरावरील परीक्षा केंद्र देण्यात यावे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबवावे.

 अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक श्रमिक व कामगार संघटना परिक्षा सुरू होण्या अगोदरच आरोग्य विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता व महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक श्रमिक व कामगार संघटना जिल्हा उपाध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री मा श्री राजेश जी टोपे यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे

Post a Comment

0 Comments