अकोला आझाद नायक ( प्रतीनिधी )
पातुर तालुक्यातील मळसुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व परिचारिका मुख्यालय येथे राहत नसून डॉक्टर परिचारिका दररोज अपडाऊन करीत असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेवर पोहोचू शकत नाही त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी तासनतास ताटकळत बसावे लागते असे प्रकार आरोग्य केंद्रात नेहमीच घडत असल्याने वरिष्ठांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलेचे अनेक रुग्ण उपचारासाठी दोन तासात करत असल्याचा प्रकार काही दिवसा अगोदर उघडकीस आला होता त्यामुळे रुग्णांमध्ये संतापाची लाट उसळली होती हा प्रकार पहिल्यांदाच नव्हे तर यापूर्वी सुद्धा अनेक वेळा उघडकीस आला आहे याकडे संबंधित आरोग्य विभागाच्या वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे वेळेवर उपचार मिळत नसल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत संबंधित आरोग्य विभागाला अजून किती बळीची आवश्यकता आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावा या उद्देशाने व परिचारिका यांना मुख्यालय राहण्याचे संबंधित वरिष्ठ प्रशासनाचे आदेश आहे परंतु डॉक्टर व परिचारिका यांच्यावर संबंधित वरिष्ठां चा धाक नसल्याने तसेच पाठबळ असल्याने डॉक्टर व परिचारिका मुख्यालयात राहत नसून अपडाऊन करीत आहेत डॉक्टर व परिचारिका वेळेवर उपस्थित नसल्याने रुग्णांना उपचारासाठी तासन्तास ताटकळत बसावे लागत आहे त्यामुळे मुख्यालयी न राहणाऱ्या डॉक्टर व परिचारिका यांना निलंबित करण्यात यावे.
अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक श्रमिक व कामगार संघटना जिल्हा
अध्यक्ष आशिष भाऊ सावळे व जिल्हा उपाध्यक्ष उमेश भाऊ इंगळे यांच्या उपस्थितीत, पातुर तालुका अध्यक्ष रक्षण भाऊ देशमुख यांच्या तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
अशी मागणी रुग्णसेवक श्रमिक व कामगार संघटना अकोला जिल्हा सचिव सतीश सुभाष तेलगोटे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे
0 Comments