शहीद आनंद गवई ह्यांचे स्मारका साठी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या जागेवर शहीद आनंद गवई ह्यांचे पुतळ्या जवळ सत्याग्रह करणारे तिन्ही शहीदाच्या कुटुंबातील सदस्य ह्यांना बंदी बनविण्यात आल्याचा संतापजनक प्रकार आज अकोल्यात घडला.
शहीद आनंद गवई यांच्या स्मारका साठी त्यांचे आई वडील उपोषणाला बसले असताना त्या तीन कुटुंबातील शहीद सुमेध गवई (लोणाग्रा) २०१७, आई वडील मायावती वामन गवई, शहीद आनंद गवई (बायपास अकोला) चे आई वडील गौकणाबाई शत्रुघ्न गवई आणि शहीद संजु खंडारे (माना)२०१७, ह्यांचे आई वडील सुलोचना सुरेश खंडारे हे फॉरेस्ट अधिकार्यांनी पार्कच्या गेटला कुलूप लावून शहीद आनंद गवई, शहिद संजू खंडारे आणि शहीद सुमेध गवई ह्यांचे कुटुंबातील सदस्यांना डांबुन ठेवले होते.
त्या विरुद्ध संतप्त वंचित बहुजन यूवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देडवे, बुलडाणा प्रभारी प्रदीप वानखडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन शिराळे व पदाधिकारी ह्यांनी लक्झरी बस स्टँड मागे धाव घेऊन गेटचे कुलुप तोडून तिन्ही शहीद परिवारास मुक्त केले.सोबतच तोडलेला वीज पुरवठा पूर्ववत केला.
लक्झरी बस स्टॅंड च्या बाजूला असलेल्या बगीचा येथे शहीद आनंद गवई ह्यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले.
वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाने शहिदांच्या कुटुंबाचा अवमान केल्यास वंचित च्या स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा राजेंद्र पातोडे ह्यांनी दिला ह्यावेळी आतिष सिरसाट, संजय नाईक,निक्की डोंगरे,गजानन दांडगे,उपसभापती आनंद डोंगरे , उमेश निखाडे, मुरलीधर पातोडे, समाधान तायडे, मनोज गोपणारायन अनिल वानखडे, संदिप इंगळे, सूरज सिरसाट प्रामुख्याने उपस्थित होते.
0 Comments