अमळनेर नगरपालिकेचे फिल्टर इन्स्पेक्टर गणेश शिंगारे यांच्या संकल्पनेंतून सव्वा दोन लाख लिटर पाण्याची बचत
अमळनेर शहराला जळोद येथील तापी नदीवरून पाणीपुरवठा होतो. गांधली गावाला फिल्टर प्लांट असून, तेथे तासाला तीन लाख लिटर याप्रमाणे २० तास पंप चालवून ६० लाख लिटर पाणी उचलले जाते. रोज फिल्टर प्लांट धुण्यासाठी लाखो लिटर पाणी लागते. यंत्रणा उभारल्यापासून रोज अडीच लाख लिटर गाळाचे पाणी वाया जात असल्याने ते नाल्यात सोडले जात होते.
फिल्टर प्लांटमध्ये ऍलम आणि टीसीएल टाकले जात असल्याने वाया जाणाऱ्या पाण्यापासून पुन्हा पिण्यायोग्य पाणी करू शकतो अशी संकल्पना फिल्टर इन्स्पेक्टर गणेश शिंगारे यांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व पाणीपुरवठा अभियंता सत्यम पाटील यांच्यासमोर मांडली.
प्रायोगिक तत्त्वावर मान्यता दिल्यानंतर गणेश शिंगारे यांनी नाल्यात सोडणारे पाणी काँक्रिटच्या टाकीत साठवले ते स्थिर झाल्यानंतर त्यात पंप टाकून जवळ पास ९० टक्के पाणी म्हणजे साधारणत: दोन ते सव्वा दोन लाख लिटर पाणी उचलून त्याला तापी नदीवरून येणाऱ्या प्रवाहात सोडून परत त्याचे शुद्धीकरण केल्याने ते पाणी पिण्या योग्य झाले.
गाळयुक्त पाण्याचा टीडीएस १९८,तर शुद्ध पाण्याचा टीडीएस १०६ पर्यंत आढळून आला.
0 Comments