अकोल्यातील गुडधी रेल्वे गेट चौकीसमोर रेल्वे खाली उडी घेत एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
अकोल्यातील मोठी उमरी परिसरातील रहिवाशी आहे. या घटनेने घटनास्थळी एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अकोल्यामध्ये राहणाऱ्या श्रृतीने डांगे हि गुडधी रेल्वे बंद असाताना तिची दुचाकी वाहन रेल्वे गेटसमोर उभी केली. रेल्वे येत असताना खालून जावून रेल्वे समोर येऊन उभी राहिली. या गेटसमोर उपस्थित असलेल्या नागरिक आणि रेल्वे कर्मचाऱ्याने आरडा ओरड करून श्रृतीला बाजूला हो रेल्वे येत आहे अशी विनंती केली. मात्र काही कळायच्या आतच रेल्वे आल्याने त्यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी उपस्थित तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर ताबडतोब सिव्हिल लाइन पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली
व या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
श्रुती नाजुकराव डांगे असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव आहे. तिचे वडील एका बँकेत कार्यरत असून ते उमरी परिसरात भाड्याने राहत आहे. श्रुतीचा उद्या म्हणजेचं 13 जून रोजी वाढदिवस आहे. अन् वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर तिने रेल्वे समोर आत्महत्या केली. श्रृतीने आत्महत्या केल्यानंतर अकोल्यात खळबळ उडाली आहे.
मात्र तिने आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही समोर आले नाही या घटनेने अकोला शहरात व परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments